आमची गोष्ट
आमची गोष्ट
‘महावस्त्रम’ ची मुख्य संकल्पना ही टॅगलाइनद्वारे ‘बंध वस्त्रांचे, अनोख्या नात्यांचे’, नातेसंबंधातील वेगळेपण दर्शवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी सगळ्या प्रकारचे विविध व्हरायटी असणारे कपडे प्रदान करणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
‘महावस्त्रम’ हे एक मल्टिपल ब्रँड आउटलेट आहे. जे स्थानिक लोकांना जागतिक स्तरावरील फॅशनची ओळख करून देण्यास मदत करते. कपड्यांच्या विविध प्रकारातून व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवण्यासोबतच नात्यातील बंध, त्यातील हळुवारपणा उलगडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
महावस्त्रमची ही तिसरी पिढी आहे जी कापड व्यवसाय जोमाने करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निम-शहरी परिसरातील लोकांना जागतिक ट्रेंडची फॅशन उपलब्ध करून देण्यासाठी महावस्त्रम प्रयत्नशील आहे. महावस्त्रम हे फॅशन जगतातील एक अग्रगण्य फॅमिली मॉल म्हणूनच कार्यरत आहे. जे ग्राहकांची कपड्यांच्या आवडी-निवडी विचारात घेऊन त्यांना उत्तम व्हरायटी, नाविन्यता उपलब्ध करू देत आहे.
आमचे मिशन
आमचे ध्येय सोपे असून फॅशनद्वारे पारंपारिकता आणि आधुनिकता यांचा मेळ घालून नात्यातील बंध उलगडणे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आवडी, विविधता आणि मागणी नुसार व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या कपड्यांमधले नाविन्य जपण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
आमची दृष्टी
आमचा दृष्टीकोन केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन फॅशन आणि नातेसंबंध यांना एक वेगळी ओळख देण्याचा आहे. महावस्त्रम शैली, गुणवत्ता आणि सौंदर्य यांची अनोखी गुंफण आहे. सध्याच्या दर दिवसाला ट्रेंड बदलणाऱ्या दुनियेत महावस्त्रमचा एक खास, वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवण्याचा प्रयत्न आहे. उद्योगात आघाडीवर राहणे, ट्रेंड सेट करणे आणि कपड्यांद्वारे त्याचे वेगळेपण सातत्याने देत राहणे याकडे आमचा मुख्य कल आहे.
आमची मूल्ये
पश्चिम महाराष्ट्रातील निमशहरी भागातील ग्राहकांना कपडे विकत घेण्याचे समाधान देणे आणि गुणवत्ता, दर्जा कायम ठेवून माफक दरात गरजा पुरवणे ही ‘महावस्त्रम’ ची मूलभूत निहित मूल्ये आहेत. आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या गोष्टी यातील अंतर कमी करून उत्कृष्ट दर्जाची फॅशन प्रदान करणे हे मूळ उद्दिष्ट असून हे मूल्य आम्ही सर्वोत्तम पद्धतीने जपतो आहे.